नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या निवृत्त कर्मचा-यांच्या निवृत्तीवेतना संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी साई सभागृह, गांधीनगर, नागपूर येथे 23 ऑगस्ट 2019 रोजी पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारींची सुनावणी व त्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकार आणि अकाउंटंट जनरलचे (महालेखाकार) प्रतिनिधी उपस्थित राहतील.
अदालत दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाईल. सकाळी 9 ते 1 वाजेदरम्यानच्या पहिल्या सत्रात नागपूर, गोंदिया, भंडारा,वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील निवृत्त कर्मचा-यांच्या तक्रारी ऐकल्या जातील. दुपारी 1 ते 4 या वेळेत औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद,परभणी, हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांतील निवृत्त कर्मचा-यांची तक्रार ऐकली जाईल.
तक्रारींची त्वरित आणि कार्यक्षम निवारण सुविधा उपलब्ध होण्यासाठी, पेन्शनधारकांना त्यांच्या तक्रारी नोंदणी महालेखाकार कार्यालयात अगोदरच नोंदवण्याची विनंती करण्यात येत आहे. 14 ऑगस्ट 2019 पूर्वी, महालेखाकार (लेखा व हकदारी) कार्यालय, महाराष्ट्र, रवी भवन समोर, सिव्हील लाइन्स, नागपूर – 440001 या कार्यालयात तक्रार दाखल करून नोंदवता येते.
तक्रारी 14 ऑगस्ट च्या आधी किंवा त्यापूर्वी ईमेलद्वारे: pensiontakrarngp@gmail.com या ई-मेल आयडी वर पाठविल्या जाऊ शकतात अथवा एस.एम.एस किंवा व्हाटस्अॅप च्या माध्यमातूनही 9423441755 या क्रमांकावर तक्रारी पाठवता येतील. राज्य सरकारच्या विभागाशी संबंधित तक्रारी सह संचालक लेखा व कोषागार, सचिवालय परिसर, सिविल लाइंस, नागपुर याना jd.nagpur@mahakosh.in या ईमेलआईडी वर पाठविल्या जाऊ शकतात, अशी माहिती महालेखाकार (लेखा व हकदारी) कार्यालय नागपूरद्वारे दिली गेली आहे.