नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा नागरी सेवा पूर्वपरीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना कोरोना चाचणी करुन घ्यावी लागणार असल्याचं वृत्त केंद्रीय लोक सेवा आयोगानं फेटाळून लावलं आहे. ज्यांची चाचणी नकारात्मक येईल त्यांनाच या परीक्षेला बसू दिलं जाईल, असं या वृत्तात म्हटलं होतं.

मात्र ही बातमी खोटी असून अशा कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, आय़ोगाच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती तपासून पाहावी, असं आवाहनही आयोगानं केलं आहे.