नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्यापासून केंद्रिय क्रीडा मंत्रालय देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन हा धावण्याचा कार्यक्रम सुरू करणार आहे. क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे.
कोविड 19 संदर्भातले नियम पाळून जनतेला आरोग्य चांगलं राखण्याबाबत प्रोत्साहन देणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. उद्यापासून गांधीजयंतीपर्यंत सुरू राहणाऱ्या या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी फिट इंडिया संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.