नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला, जगभरातल्या बांधकाम व्यवसाय क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या उपकरणं आणि अवजारांचं उत्पादन केंद्र बनवणं हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे असं सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. या क्षेत्राशी संबंधित उद्योगजगतानं, औद्योगिक समुह विकसित करणं, तंत्रज्ञान केंद्र, संशोधन प्रयोगशाळा उभारणं, तंत्रज्ञान आणि कौशल्याचं अद्ययावतीकरण करणं यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.

यासाठी सरकार सर्व भागधारकांना आवश्यक ते सहकार्य करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं. मोठ्या उद्योगसमुहांनी, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांच्याकडून असलेली देणी लवकर चूकती करावीत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.