नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रादुर्भावाचं सावट असूनही यंदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात सुमारे ४० टन सोन्याची विक्री झाली. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत २० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या विक्रीत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी दिली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत सुमारे ७० टक्क्यांनी वाढ होऊनही विक्रीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.