पुणे : विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे- 411007 यांच्या विद्यमाने दिनांक 24 ऑगस्ट 2020 पासुन ते 02 सप्टेंबर 2020 रोजी पर्यंत पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात रोजगारानिमित्त ऑनलाईन मुलाखती घेण्यासाठी पुणे औद्योगिक परिसरातील एकूण -12 उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एकूण 1934 रिक्तपदे कौशल्य विकास व रोजगार विभागाला कळविण्यात आलेली आहेत. नोवेल कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे ओढावलेल्या बेरोजगारीच्या संकटामुळे बेरोजगारांना ऑनलाईन रोजगार मेळावा व मुलाखतीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उपलब्ध रिक्तपदांसाठी दहावी पेक्षा कमी शिक्षण असणारे तसेच इ.10 वी, 12 वी कोणत्याही शाखेचा पदवीधर, आय.टी.आय, डिप्लोमा होल्डर व इंजिनिअरिंग अशा सर्व उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
एम्लॉयमेंट कार्यालयाकडे ऑनलाईन नाव नोंदणी केलेले सर्व उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. तसेच ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नसेल त्यांनी राज्य शासनाच्या WWW.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर जावुन आपली नविन नोंदणी करु शकता व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपण ऑनलाईन अर्ज करु शकता,असे आवाहन विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र,पुणेचे सहाय्य्क आयुक्त् वि.वि.कानिटकर यांनी केले आहे.