नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानने भारताला कोविड-१९ संकटाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन आधार म्हणून ३ हजार ५०० कोटी रुपयांचं विकास सहाय्य करण्याचं वचन दिलं आहे. आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांसाठी कर्ज स्वरुपात ही मदत राहणार आहे.

आर्थिक व्यवहार विभागातले अतिरिक्त सचिव डॉक्टर सी. एस. महापात्र आणि जपानचे भारतातले राजदूत सुझुकी सातोशी यांनी यासंदर्भातली कागदपत्रं एकमेकांना दिली. यानंतर डॉक्टर महापात्र आणि नवी दिल्लीतील जपानचे प्रतिनिधी कातुसो मात्सुमोतो यांनी कर्जाच्या करारावर स्वाक्षरी केली.