नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आवश्यक ऊर्जा स्वत: निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून ९६० स्थानकं सौरउर्जेवर चालवली जात असून त्यात वाराणसी, जयपुर, सिकंदराबाद, कोलकाता, गुवाहाटी, हैदराबाद, हावडा अश्या काही मोठ्या स्थानकांचा समावेश आहे.
५५० स्थानकांवर सौरऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. रेल्वेकडे मोठ्या प्रमाणात मोकळी जागा असून, त्यावर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. २०३० पर्यंत रेल्वेनं ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.