नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि ऑनलाईन मनोरंजनाच्या ओटीटी  कार्यक्रमांमध्ये काम करण्यासाठी, ६५ वर्षांवरचे कलाकार आणि संबंधित कर्मचाऱ्यांना, कोरोना प्रतिबंधक आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करायला, राज्य सरकारनं  परवानगी दिली आहे.  सांस्कृतिक कार्यमंत्री अमित  देशमुख यांनी काल ही माहिती दिली.

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, चित्रिकरणासंदर्भातली कामं नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरु करण्यासाठी, राज्य सरकारनं मे महिन्यात जारी केलेल्या  मार्गदर्शक सूचनांमध्ये, ६५ वर्षावरच्या कोणत्याही कलाकार आणि संबंधित कर्मचाऱ्यांना, चित्रीकरण स्थळावर उपस्थितीची परवानगी नाकारली होती, मात्र  उच्च न्यायालयानं परवानगी दिल्यामुळे, आता ६५ वर्षांवरचे कलाकार आणि कर्मचाऱ्यांना, चित्रीकरणात सहभागी होण्याची मुभा राहील, असं देशमुख यांनी सांगितलं.