नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायलयाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची त्यांच्या कार्यकाळातल्या वागणूकीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली.
गोगोई हे या आधीच सेवानिवृत्त झाले असल्यानं ही याचिका निरर्थक असल्यानं या याचिकेवर सुनावणी करता येणार नाही, असा निर्वाळा न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पिठानं दिली.
याचिकाकर्त्यांनी ते सेवेत असतांना ही याचिका का दाखल केली नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.