नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधे कायमस्वरुपी शांतता नांदावी, यासाठी अमेरिका तालीबान्यांबरोबर शांतता करार करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
तालीबान आणि अफगाणिस्तान सरकार यांनी जर आपली वचनबद्धता जपली तर, अफगाणिस्तानमधून अमेरिका आपले सैन्य माघारी बोलवेल. परराष्ट्रमंत्री माईक पाँम्पिओ यांच्या उपस्थितीत हा करार होणार आहे. आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर हे या कराराचा मसुदा वाचून दाखवतील.
गेली 19 वर्ष अमेरिकी फौजा अफगाणिस्तानमधून दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी तळ ठोकून बसल्या आहेत. त्या आता मायदेशी परततील, असंही ट्रम्प म्हणाले.