या मनुष्य दिवसांच्या कामाची मुख्यत्वे बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यांमध्ये निर्मिती

नवी दिल्‍ली : भारतीय रेल्वेने गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यांमध्ये 6,40,000 पेक्षा जास्त मनुष्य दिवसांच्या कामाची निर्मिती केली आहे.

रेल्वे आणि वाणीज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल या प्रकल्पांच्या प्रगतीवर आणि या योजनेंतर्गत या राज्यांमध्ये स्थलांतरित मजुरांसाठी निर्माण केलेल्या रोजगार संधींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

21 ऑगस्ट 2020 पर्यंत 12,276 कामगारांना या मोहिमेत समाविष्ट करून घेण्यात आले आणि या प्रकल्पांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना 1410.35 कोटी रुपयांचे शुल्क देण्यात आले.