नवी दिल्ली : व्हाइस ऍडमिरल  एसआर शर्मा, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी भारतीय नौदलाचे चीफ ऑफ मटेरिअल म्हणून आज (01 सप्टेंबर 2020) पदभार स्वीकारला. अ‍ॅडमिरल यांनी आय.आय.एस.सी.,बेंगळूरु मधून  संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीत  पदव्युत्तर शिक्षण घेतले असून नेव्हल हायर  उच्च कमांड कोर्सचे माजी  विद्यार्थी आहेत.

साडेतीन दशकांच्या कारकीर्दीत ऍडमिरल शर्मा  यांनी विंध्यगिरी, राणा, कृष्णा आणि म्हैसूर या भारतीय नौदलाच्या जहाजांवर विविध पदे भूषवली आहेत.

त्यांनी मुंबई आणि विशाखापट्टणममधील नौदल गोद्यांमध्ये आणि शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम अभियांत्रिकी प्रतिष्ठान (डब्ल्यूईएसईई), मुख्यालय, प्रगत टॅक्टिकल व्हेसल कार्यक्रम (मुख्यालय एटीव्हीपी) आणि नवी दिल्लीतील नौदल मुख्यालयांमध्ये वेगवेगळ्या आणि आव्हानात्मक नियुक्त्या केल्या आहेत .

ध्वज अधिकारी म्हणून अ‍ॅडमिरल यांनी नौदल मुख्यालयात असिस्टंट चीफ ऑफ मटेरिअल  (आयटी अँड सिस्टम) ,  विशाखापट्टणम नौदल गोदीचे ऍडमिरल सुप्रिटेंडन्ट म्हणून काम पाहिले आहे. मुख्य कर्मचारी अधिकारी (तांत्रिक), मुख्यालय ईएनसी; विशाखापट्टणम येथील  नौदल प्रकल्पांचे महासंचालक,   मुख्यालय एटीव्हीपीचे कार्यक्रम संचालक, आणि नौदल मुख्यालयांमध्ये वॉरशिप प्रॉडक्शन अँड ऍक्विझिशन कंट्रोलर म्हणून काम केले आहे.

त्यांच्या अतुलनीय सेवेच्या सन्मानार्थ अ‍ॅडमिरलना अति  विशिष्ट  सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.1994 मध्ये लेफ्टनंट व्ही. के. जैन सुवर्णपदकाचे ते मानकरी ठरले.

प्रधान कर्मचारी अधिकारी आणि भारतीय नौदलातील वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून अ‍ॅडमिरल हे सर्व अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, शस्त्रे, सेन्सर आणि जहाजे आणि पाणबुडीसाठी आयटी संबंधित उपकरणे आणि प्रणालीचे  देखरेख व्यवस्थापन आणि लाइफ-सायकल प्रॉडक्ट सपोर्टशी संबंधित सर्व बाबींचे प्रभारी असतील.

जवळपास  चार दशकांची उल्लेखनीय नौदल कारकीर्द पूर्ण करून निवृत्त होत असलेले व्हाईस ऍडमिरल  जीएस पाब्बी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.