मुंबई : तैवानमधील बहुराष्ट्रीय कंप्युटर हार्डवेअर आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सचा तसेच भारतात वेगाने विस्तारवणारा कंझ्युमर लॅपटॉप ब्रँड आसूसने आता आणखी एक नवी सुरुवात केली आहे. व्यावसायिक पीसी क्षेत्रात प्रवेश करण्याची कंपनीने आज घोषणा केली. मदरबोर्ड्स आणि हायटेक गेमिंग पीसीमध्ये अतुलनीय पारंगत असणारा पीसी उद्योगातील एक अत्यंत रुजलेला खेळाडू असलेल्या या ब्रँडची ही नवी खेळी म्हणजे पुढील धोरणात्मक पाऊल आहे. व्यावसायिक पीसी श्रेणीत आसुसची सुरुवात अशा वेळी होत आहे, जेव्हा उद्योग जगातील अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचा-यांना घरून काम करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांना मजबूत वर्किंग सोल्युशन्सची गरज भासते.
मायक्रो बिझनेस, एसएमबी आणि मोठ्या एंटरप्राइझ ग्राहकांसह सर्व आकाराच्या व्यवसायांना सुविधा पुरवत आसूस त्यांच्या गरजांनुसार तंत्रज्ञानाच्या गरजा पूर्ण करेल. सर्व महत्त्वाच्या विभागांमधील उत्पादनांत नोटबुक्स, डेस्कटॉप, ऑल इन वन्स आणि मोबाइल वर्कस्टेशन्स इत्यादी उत्पादनेही या ब्रँडद्वारे लाँच केली जातील. नवीनतम प्रोसेसरसोबत उत्पादनांची श्रेणी आणण्यासाठी ब्रँड मायक्रोसॉफ्ट आणि इंटेलसोबत एकत्र काम करेल. या उत्पादनांसह, आसूस वॉरंटी एक्सटेंशन पर्याय, अॅक्सिडेंटल डॅमेज प्रोटेक्शन, हार्ड डिस्क रिटेंशन सर्व्हिस आणि प्रायोरिटी सर्व्हिस यासारख्या उद्योगांसाठीच्या मूल्यवर्धित सेवाही कंपनीद्वारे दिल्या जातील.
आसुस इंडिया आणि साउथ एशिया, सिस्टिम बिझनेस ग्रुपचे रिजनल डायरेक्टर, लिओन यू म्हणाले, “आसुससाठी भारत हा सर्वात महत्त्वाच देश आहे.भारतीय ग्राहकांच्या गरजांवर सर्वाधिक भर दिल्यामुळे आणि कंप्युटिंग उत्पादनातील आमचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव वापर करत आम्ही भारतीय पीसी मार्केटमध्ये वेगाने वाढणारा ब्रँड म्हणून उभे राहत आहोत. कंझ्युमर पीसी विभागात, आम्ही भारतीय बाजारात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. भारतात हाच ग्राहक केंद्रीत बिझनेस आता अधिक विस्तृत नावीन्यपूर्ण, अत्याधुनिक उत्पादनांद्वारे वाढवण्याचा आमचा मानस आहे. ही उत्पादने उद्योगांसाठी असतील. एंटरप्राइज ग्राहकांसाठी आसूस हा बेस्ट-इन-क्लास टेक्नोलॉजी सोल्युशन प्रदाता म्हणून उभा राहील, असा यामागील हेतू आहे.”