नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज पुन्हा फेटाळली.
या परीक्षा पुढे निर्धारित वेळीच होतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा पुढं ढकलाव्यात अशी मागणी सहा राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या फेरविचार याचिकेत केली होती.