मुंबई (वृत्तसंस्था) : ५० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना सक्तीनं संस्थात्क विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय झाला.

या निर्णयानुसार आता ५० ते ६० वर्ष वयोगटातल्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी विलगीकरणात राहण्याची परवानगी मिळू शकणार आहे, मात्र ६० वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं जाणार आहे. दरम्यान निर्णय रद्द झाला असला तरी, ५० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आणि गृहविलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांचे कौटुंबिक डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांशी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सल्लामसलत केली जाईल असं बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे.