मुंबई (वृत्तसंस्था) :काल संपलेल्या, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ९ विधेयकं मंजूर झाली. त्यात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयकाचा समावेश आहे.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनुषंगानं या अधिवेशनात शक्ती कायद्यावर चर्चा होणार होती. मात्र हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
शक्ती विधेयकासाठी संयुक्त समिती गठीत केली आहे. २१ सदस्यांच्या या समितीत विधानसभेचे १४ आणि विधानसपरिषदेचे ७ सदस्य आहेत. अनिल देशमुख या समितीचे अध्यक्ष आहेत. या विधेयकावर पुढच्या अधिवेशनात चर्चा केली जाईल, असं देशमुख यांनी सांगितलं.
विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्चपासून सुरु होणार आहे.