नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील लघु, सूक्ष्म, आणि मध्यम उद्योग क्षेत्रात ५ कोटी रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे अशी माहिती या खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते काल नीती आयोगान आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले की एम एस एम ई क्षेत्राचं देशाच्या जीडीपी मध्ये सध्याचं योगदान ३० टक्के इतकं आहे. ते ५० टक्क्यापर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशाच्या आदिवासी आणि मागास भागातील ११५ जिल्हे विकासाच्या प्रवाहात आणले तर देशाच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना देता येईल असं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं.