नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा प्रारंभ केला. देशातल्या  मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आखलेल्या या योजनेत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

यामुळे २०२४-२५ पर्यंत देशाच्या मत्स्य उत्पादनात ७० लाख टनांची अतिरिक्त वाढ करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इ-गोपाला या अँपचं देखील उद्घाटन केलं. या पोर्टल द्वारे शेतक-यांना प्रजाती सुधारणांसह, बाजारपेठची उपलब्धता आणि इतर माहिती मिळू शकेल.