700 कोटी रुपयांचा आयकर वाचवण्यासाठी करण्यात आलेले गैर व्यवहार उघडकीस

नवी दिल्ली : मुंबईच्या आयकर विभागाने 29 जुलै 2019 रोजी शोध आणि पकड मोहिम प्रामुख्याने 40 गृहबांधणी विकास समुहासाठी मुंबई आणि पुणे येथे राबवली. या धाडी दरम्यान आयकर विभागाने पैशासंबंधी फ्लॅट विक्रीच्या पावत्या पुरावा म्हणून जप्त केल्या. यामध्ये व्यावसायिक आणि रहिवाशी क्षेत्र, बोगस असुरक्षित कर्ज, बोगस दीर्घकालीन भांडवल नफा आणि इतर विविध गैरव्यवहारांच्या जवळपास 700 कोटी आयकर वाचवण्यासाठी असलेले प्रकल्प समाविष्ट आहेत.

लेखांमधील अफरा-तफर, 525 कोटी रुपयांच्या आय व्यवहाराबाबत शोध मोहिम राबवण्यात आली असून 100 कोटी रुपयांचे व्यावसायिक गृह प्रकल्पांच्या पावत्या ‘ ऑन मनी’ यावेळी जप्त करण्यात आल्या तसेच 14 कोटी रुपयांचे दागदागिने जप्त करण्यात आले असून याबाबत चौकशी चालू आहे.