मुंबई : विस्तारित मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलाला आज पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आरे येथील जी ६०० एकर जागा जंगल म्हणून घोषित केली आहे. त्या जागेतील युनिट ४, २१ व २२ ला त्यांनी भेट दिली.
यावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, दुग्धविकास आयुक्त श्री. भांगे आदी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे मंत्री श्री. ठाकरे यांनी आज वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील व इतर अधिकारी यांच्या समवेत मालाड (वेस्ट) मधील एरंगळ येथील एमटीडीसीच्या जागेची पाहणी केली. मुंबईकर आणि पर्यटकांना याठिकाणी लवकरच पर्यावरणपूरक पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.