नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसंच चलन व्यवस्थेमधे तरलता येण्यासाठी भारतीय रिझर्व बँक आवश्यक ते सर्व उपाय योजेल, असं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे. उद्योजकांच्या संघटनेतर्फे आयोजित एका वेबिनारमधे ते आज बोलत होते.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाल्याच्या पार्श्र्वभूमीवर अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्यानं सुरळित होईल, असंही दास यांनी यावेळी नमूद केलं.

बँकेने विविध क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीत  एप्रिल ते ऑगस्ट या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ हजार ६१५ कोटी रुपयांची रुपयांची वाढ झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बँकेने अनेक पावलं उचलल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्योग व्यवसायाला सध्या उभारी देण्यासाठी शक्य त्या सगळ्या उपाययोजना केल्या जातील असं त्यांनी आश्वस्त केलं.