प्रतिकार शक्तीला चालना देणारी ११ नवी उत्पादने केली सादर

मुंबई : आरोग्य, निरोगीपणासाठी अत्यंत नैसर्गिक उत्पादने प्रदान करण्यासाठी कटीबद्ध असलेल्या उपकर्मा आयुर्वेदने आपल्या उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार केला आहे. सध्या निरोगी राहण्यावरील भर वाढला असल्याने उपकर्मा आयुर्वेदने ग्राहकांच्या मागणीनुसार प्रतिकार शक्ती वाढवणारी ११ नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. यात प्रतिकार शक्ती वाढवणारे रस, ड्रॉप्स, उत्तम गुणवत्तेचे च्यवनप्राश, शिलाजीत लिक्विडसह आयुष क्वाथ या अत्यंत प्रभावी काढ्याचा समावेश आहे.

३९९ ते ११९९ रुपयांच्या किफायती किंमतीत ही उत्पादने उपकर्मा आयुर्वेदच्या अधिकृत वेबसाइटसह अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नायकासारख्या प्रमुख पोर्टलवर तसेच देशभरातील १०,००० पेक्षा जास्त दुकानांतील मजबूत ऑफलाइन नेटवर्कमध्ये उपलब्ध होतील.

ग्राहकांची प्रतिकार शक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्याचा उद्देशाने सादर करण्यात आलेल्या या उत्पादनांमध्ये आवळा रस, कोरफड रस आणि तुळस-गुळवेल रस, आवळा ड्रॉप्स, गुळवेल ड्रॉप्स, अद्रक ड्रॉप्स, तुळस ड्रॉप्स, शिलाजीत लिक्विड तसेच आवळा, दालचिनी, पिप्पली, लवंग यांसारख्या ३० पेक्षा अधिक वनस्पतींपासून निर्मित उत्तम गुणवत्तेचे च्यवनप्राश आणि तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ इत्यादी नैसर्गिक घटकांपासून बनवलेला प्रभावी काढा आयुष क्वाथ यांचा समावेश आहे. प्रतिकार शक्ती प्रभावीपणे वाढवण्याकरिता या क्षेत्रातील तज्ञांनी या प्रत्येक उत्पादनावर महिनोंमहिने संशोधन केले आहे.

उपकर्मा आयुर्वेदचे संस्थापक श्री. विशाल कौशिक म्हणाले की, ‘ उपकर्मा आयुर्वेदमध्ये आम्ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. याद्वारे आम्हाला सातत्याने नवी उत्तम गुणवत्तेची आयुर्वेदिक उत्पादने तयार करण्यास प्रेरणा मिळते. आधुनिक काळातील सर्व प्रकारच्या आरोग्य आणि निरोगीपणादरम्यान येणा-या समस्यांची उत्तरे आयुर्वेदाकडे आहेत, यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळेच सध्याच्या जागतिक संकटात उत्तम आरोग्याबद्दल विश्वास निर्माण करण्याकरिता आमची प्रतिकार शक्तीला चालना देणारी  उत्पादने प्रत्येकाला मदत करतील.”