मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या 1 ऑक्टोबर पासून मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि एल. बी एस या पाचही प्रवेशद्वारावरील टोलच्या दरात पाच ते 25 रुपयांची वाढ होणार आहे. मुंबईतल्या 55 उड्डाण पुलांचा खर्च भरून काढण्यासाठी या पाचही टोल नाक्यांची निर्मिती करण्यात आली होती. 2002 ते 2027 अशी कालमर्यादा निश्चीत केली होती.

राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ होते. लहान वाहनांच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. तर 20 आसनी बसच्या टोल दरात 10 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मोठ्या बस आणि ट्रकच्या दरात 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.