सार्थक यांनी ३५० हून अधिक मुलांसाठी ऑनलाईन थेरपी सेशन, २५०० हून अधिक दिव्यांगांचे कौशल्य विकास आणि ८०० हून अधिक दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य केले

मुंबई : कोविड -१९ चा परिणाम संपूर्ण जगाला झाला आहे.पण ह्या संकटात सगळ्यात जास्त परिणाम झाला आहे तो दिव्यांग लोकांना.. अश्या परिस्थितीत दिव्यांग लोक कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जात आहेत याचा सहज अंदाज येतो. म्हणूनच सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट आणि नॅशनल एबिलिम्पिक्स असोसिएशन ऑफ इंडियाने “दृष्टिकोण” नावाखाली पुढाकार घेतला आहे.ह्या अंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेत्यांशी सल्लामसलत करून दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने योग्य निर्णय घेण्यात येईल.

लॉकडाऊन दरम्यान, सार्थक यांनी ३५० हून अधिक मुलांसाठी ऑनलाईन थेरपी सेशन, २५०० हून अधिक दिव्यांगांचे कौशल्य विकास आणि ८०० हून अधिक दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पाऊले उचलली. दिल्ली, गुरुग्राम, लुधियाना, चंदीगड, कोलकाता, लखनऊ, भोपाळ, जयपूर, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई आणि विशाखापट्टणममधील दिव्यांगांना याचा फायदा झाला.

“Global Impact of COVID 19 on the disabled community” या वेबिनारमध्ये जगभरातील अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती, ज्यात क्रेडिट सुईस व्हीपी कॉर्पोरेट सिटीझनशिप शर्मिन कुटकी, युरोपियन सोशल नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्फोंसो लारा मॉन्टरो, कॉग्निझंट फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री नटराजन यांचा समावेश होता. ऍक्सिस बँक, अंबिट कॅपिटल, लेमन ट्री ग्रुप आणि पीडब्ल्यूसी इंडिया या कॉर्पोरेट्समधील वक्तेही सहभागी झाले होते.

सार्थक एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जीतेंद्र अग्रवाल म्हणाले की, “दिव्यांगांना योग्य स्त्रोत आणि पुरेशी संधी मिळाल्यास राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना चांगले योगदान मिळू शकते. कोविड -१९ मुळे लादलेल्या निर्बंधामुळे अनेक दिव्यांगांच्या रोजगारावर जसे लहान व्यवसाय, कॉर्पोरेट नोकरी किंवा इतर अनौपचारिक उदरनिर्वाहाचे उपक्रम (उदा. होम सेल फोन दुरुस्ती किंवा मशीन दुरुस्तीची दुकाने, वस्तूंची विक्री इ.)  परिणाम झाला आहे. दिव्यांगांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांच्या हितासाठी आवश्यक ती पावले उचलणे हे या वेबिनारचे उद्दीष्ट आहे.” अशा प्रकारे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आघाडीवर कोव्हीडनंतर त्यांच्यासाठी पुनरुज्जीवन पॅकेजेस, समुपदेशन सेवा, कौशल्य-निर्मिती, नवीन संधी, वर्क फ्रॉम होम मॉडेल , सीएसआर खर्च, नाविन्य आणि तंत्रज्ञान या  महत्वाच्या बाबींवर  विचारविनिमयावर प्रकाशझोत टाकला.

वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑन डिसएबिलिटीचे सीईओ मार्सी रॉथ म्हणाल्या, “दिव्यांगांना संसाधनांचा मर्यादित प्रवेश करणे ही मोठी समस्या आहे. दिव्यांगच्या मूलभूत गरजा समजून घेऊन तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा उपयोग त्यांच्या हितासाठी करणे ही काळाची गरज आहे. दिव्यांगांवर होणाऱ्या परिणामाबद्दल संयुक्त स्तरावरील संशोधनात जागतिक स्तरावर सर्व संबंधित व्यक्तींनी एकत्र येण्याची आणि भागीदारीद्वारे तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने दिव्यांगांसाठी समावेशावरील कामाची दिशा बदलेल.

दिव्यांगांना चांगली नोकरी मिळवून देण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सरकारी नोकरीत ३ टक्के दिव्यांगांना संधी देणे सक्तीचे आहे, परंतु एनसीपीईडीपीच्या सर्वेक्षणानुसार सध्या सरकारी नोकरीत एकूण कामगारांपैकी केवळ 0.0५% टक्के दिव्यांग आहेत .

या वेबिनारने ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागात वेगवेगळ्या सक्षम लोकांपर्यंत सुलभ  तंत्रज्ञानाची गरज यावर प्रकाश टाकला तसेच  त्यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी स्ट्रक्चर्ड हेथ स्ट्रॅटेजी विकसित करण्याबाबत पुनर्विचार ऑनलाइन शिक्षण व आरोग्याच्या रणनीतीत व्यापक बदल तसेच स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागात संधी वाढविणे देखील आवश्यक आहे. ऑनलाईन तंत्रज्ञानाची(सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन)पातळीवर अधिक चांगली अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरी संस्था संघटनांचा समावेश करावा.

आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सार्थक यांनी १०५०+ हून अधिक दिव्यांग आणि ४२५+ हून अधिक मुलांच्या पुनर्वसनास मदत केली आहे. सार्थकच्या कौशल्य विकास केंद्रांनी २०,००० हून अधिक दिव्यांगांना पर्यटन, संघटित किरकोळ, आयटी आणि आयटीईएस प्रशिक्षण दिले आहे. २१ राज्यांत १५०+हून अधिक रोजगार मेळ्यावांचे आयोजनही करण्यात आले आहे. रोजगार मेळावे आणि कौशल्य केंद्रांच्या माध्यमातून १८०००+ हून अधिक दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.