नवी दिल्ली : सर्वसामान्य प्रकाश स्त्रोत म्हणून वापरात येणाऱ्या आणि  स्वच्छ पांढरा प्रकाश देणाऱ्या एलईडी दिव्यांच्या उत्पादनात रंगाचा उत्तम दर्जा राखणे हे मोठे आव्हान असते. उच्च दर्जाचा सफेद प्रकाश मिळविण्यासाठी शास्त्रज्ञांनी नवी पद्धत शोधली आहे, या पद्धतीमुळे एलईडी दिव्यांची संरचना करताना काही नव्या समीकरणांचा शोध लागला आहे.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सीईएनएस अर्थात सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस या स्वायत्त संस्थेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या  संशोधनातून काही नवे ज्ञान मिळविले आहे. त्यानुसार सीसियम लेड हॅलाईड या पदार्थाचे अत्यंत लहान खडे , चांगल्या दर्जाचा सफेद प्रकाश देऊ शकत असले तरीही काहीवेळा विचित्र कारणांमुळे ते खडे हा प्रकाश देऊ शकत नाहीत.

डॉ.प्रलय के.संतरा यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या पथकाने यावर उपाय शोधला आहे. त्यांच्या लक्षात आले की  त्या खड्यांतील हॅलाईड कण सामान्य तापमानाला देखील हालचाल करतात आणि नॅनोक्रिस्टल चे संयुग तयार करतात आणि  त्यातून स्वच्छ सफेद प्रकाश उत्सर्जित होतो. हे संशोधन नॅनोस्केल या पत्रिकेत नुकतेच प्रकाशित झाले आहे.

अधिक माहितीसाठी डॉ.प्रलय के.संतरा यांच्याशी psantra@cens.res.inया ईमेल वर संपर्क साधता येईल.