नवी दिल्ली : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संवाद व संपर्क साधत देशात वैज्ञानिक दृष्टीकोनाला प्रोत्साहन देण्याच्या क्षेत्रात विशेष योगदान देण्याबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठीची नामांकने मागवण्यात आली आहेत.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची शाखा असलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संवाद आणि संपर्क विषयक राष्ट्रीय परिषदेने वर्ष 2020 साठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यासाठी. ही नामांकने मागवली आहेत. राष्ट्रीय विज्ञान दिनी, म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी, नवी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील.
प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. दरवर्षी, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात एखादी व्यक्ती किंवा संस्थेला, समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यास सहकार्य केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. गेल्या पाच वर्षात सहा श्रेणीत काम केलेल्यांची या पुरस्कारासाठी निवड केली जात आहे:
या श्रेणी म्हणजे- विज्ञान-तंत्रज्ञान संवाद आणि संपर्क निर्माण करण्याच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल पाच लाख रुपये, मुद्रित माध्यमे-मग ती पुस्तके असोत अथवा मासिके- यांच्यामार्फत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संवाद साधण्याबद्दल, लहान मुलांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय केल्याबद्दल, इलेक्ट्रोनिक माध्यमातून विज्ञान तंत्रज्ञान विषयक कार्यक्रम केल्याबदल, पाच लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो.
दरवर्षी हे पुरस्कार दिले जात असून, 35 वर्षावरील कोणीही भारतीय नागरिक अथवा नोंदणीकृत संस्थांची शिफारस या पुरस्कारासाठी लिखित अर्जाद्वारे केली जाऊ शकते.
या योजनेची सविस्तर माहिती, पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना, बघण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.dst.gov.in. या संकेत स्थळाला भेट द्यावी.
संपूर्ण माहिती भरलेला विहित नमुन्यतील अर्ज, आणि कागदपत्रे, डॉ एबीपी मिश्रा, वैज्ञानिक, NCSTC विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, इमेल : apmishra@nic.in येथे 31 ऑक्टोबरपर्यंत पाठवावीत.