नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२२ मधे घेतलेल्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा पहिले तीन क्रमांक महिला उमेदवारांनी पटकावले आहेत. देशभरातून प्रथम क्रमांकावर ईशिता किशोर, दुसऱ्या क्रमांकांवर गरिमा लोहिया आणि तिसऱ्या क्रमांकावर उमा हारथी यांची निवड झाली आहे. यंदाच्या परीक्षेता एकूण ९३३ उमेदवारांची निवड झाली असून, त्यातले ३४५ सर्वसाधारण गटातले तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातले ९९ उमेदवार आहेत. इतर मागासवर्गीय गटातले २६३ तर अनुसूचित जातीचे १५४ आणि अनुसूचित जमातीतले ७२ उमेदवार यंदा निवडले गेले आहेत. यंदाची प्रवेश परीक्षा येत्या २८ मे रोजी होणार आहे.