नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व कफ सिरप निर्यातदारांनी कफ सिरप निर्यातीची परवानगी मिळण्यापूर्वी १ जुन पासून त्यांच्या उत्पादनांची चाचणी सरकारी प्रयोगशाळांमध्ये करणं आवश्यक असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. १ जूनपासून निर्यातदारांना प्रयोगशाळांचे तपासणी आणि विश्लेषण प्रमाणपत्र मिळाल्यावरचं कफ सिरपच्या निर्यातीला परवानगी दिली जाईल.
निर्दिष्ट केंद्र सरकारच्या प्रयोगशाळांमध्ये भारतीय फार्माकोपिया कमिशन गाझियाबाद, प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळा, चंदीगड आणि गुवाहाटी, केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कोलकाता, केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि राज्य सरकारांच्या अधिकृत औषध चाचणी प्रयोगशाळांचा समावेश आहे.