नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक जी एस टी विवरणपत्र सादर करण्याची मुदत या महिनाअखेर पर्यन्त वाढवली आहे. वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या उद्योगांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्थ मंत्रालयानं केलं आहे.

२०१८-१९ वर्षाच्या विवरण पत्रात फक्त त्याच आर्थिक वर्षातले व्यवहार दाखवणं आवश्यक आहे.

मात्र जर २०१७ -१८ वर्षातली माहितीही २०१८-१९ च्या जी एस टी आर ९ मध्ये समाविष्ट करून, याआधीच विवरण पत्रं सादर केली असतील, तर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.