मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगणारे, स्वातंत्र्यानंतर ग्रामविकासाच्या माध्यमातून राष्ट्रसेवेला वाहून घेतलेले ते महान संत होते. जात, धर्म, पंथाच्या भिंती मोडून त्यांनी विश्वशांती व मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केलं. गावखेड्यांच्या विकासातच राष्ट्रविकास सामावला आहे, हे सांगताना त्यांनी ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा मार्गही दाखवला. पुरोगामी, प्रगत महाराष्ट्राच्या जडणघडणीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राच्या या महान संतास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना माझी भावपूर्ण आदरांजली वाहतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.