Bengaluru: A health worker wearing a PPE kit collects a sample from a woman for the COVID-19 Rapid Antigen Test, at a city market in Bengaluru, Wednesday, Oct. 7, 2020. (PTI Photo)(PTI07-10-2020_000126B)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- देशात दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत गेल्या पाचआठवड्यांपासून सातत्यानं घट होत आहे. महिन्याभरापूर्वी दररोज 90 हजार नवे रुग्ण आढळत होते. ती संख्या आता कमी होत असून गेल्या 24 तासांत देशात 55 हजार नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. देशात सध्या सुमारे 8 लाख 38 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासांत देशात 78 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा साडेसात टक्क्यांनी अधिक आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता 86 पूर्णांक 78 शतांश टक्के झालं आहे. आत्तापर्यंत देशातील 62 लाख 30 लाख रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 706 रुग्णांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला.

त्यामुळे देशातील मृत्युदर आता 1 पूर्णांक 53 शतांश टक्क्यांवर आला आहे