नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात जमावानं दोनजणांची हत्या केल्याप्रकरणी सुरु असलेला तपास थांबवायला तसंच राज्य सरकारकडून स्थिती अहवाल मागवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.

याप्रकरणी पोलीस योग्य पद्दतीनं तपास करणार नाहीत, असा आरोप करत हा तपास न्यायालयात्या देखरेखीखाली व्हावा, किंवा तो सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी करताना आज न्यायालयानं तपास थांबवायला नकार दिला.

याचिकाकर्त्यानं याची एक प्रत राज्य सरकारला द्यावी, असं न्यायालयानं  सांगितलं. याप्रकरणी चार आठवड्यांनंतर सुनावणी होईल.