नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १ मे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन. त्यानिमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशभरातल्या सर्व स्त्री-पुरुष कामगारांचं अभिनंदन केलं आहे. आजचा दिवस हा या सर्व कामगारांच्या समर्पण आणि मेहनतीचा सन्मान करण्याचा दिवस आहे. हे सर्व कामगार समृद्ध भारताचा पाया रचत असून, देश उभारणीच्या कामातले तेच खरे शिल्पकार आहेत, असं कोविंद यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

आंतरराष्ट्ररीय कामगार संघटनेचे महासंचालक  गाय रायडर यांनीही कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन केलं आहे. कामगारांच्या समस्यांची सोडवणूक करून कामगारांसाठी सामाजिक न्यायावर आधारित व्यवस्था उभारण्याची हीच वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.