नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांचं लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली.
मुंबई महानगरात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम १ जूनपासून सुरु करण्यात आली आहे. ३१ जुलै २०२२ पर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. घराजवळच्या कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन पात्र व्यक्तिंनी कोविड लस घ्यावी, यासाठी पालिकेकडून नागरिकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे, असंही ते म्हणाले.