नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. याचिकेत उल्लेख केलेले प्रसंग मुंबईत घडले आहेत. मुंबई म्हणजे सर्व महाराष्ट्र समजू नका, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना सुनावलं. दिल्लीतले वकिल ऋषभ जैन, गौतम शर्मा आणि विक्रम गेहलोत यांनी ही याचिका दाखल केली होती.

केवळ बॉलीवूडच्या अभिनेत्याच्या मृत्यूसारख्या, काही उदाहरणांवर विसंबून महाराष्ट्रात राज्य घटनेनुसार कारभार होत नसल्याचा निष्कर्ष तुम्ही कसा काय काढला, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं याचिकार्त्यांना केला. या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाऐवजी राष्ट्रपतींकडे जाण्याची सूचनाही त्यांनी याचिकाकर्त्यांना केली.