मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत 231 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 10 जण या आजारानं दगावले. जिल्ह्यात आतापर्यंत उपचारानंतर  बरे झालेल्या रुग्णांची संख्या 37 हजार 438 इतकी आहे, तर 1 हजार 560 जण उपचारादरम्यान  दगावले.

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे 61 नवे रुग्ण आढळून आले,  74 जण उपचारानंतर  बरे  झाले  तर दोन जणांचा या आजारानं  मृत्यु झाला. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 9 हजार 236 वर पोहोचली असून  बरे झालेल्यांची एकूण संख्या 8 हजर 345 इतकी आहे.

हिंगोली जिल्ह्यात काल कोरोनाच्या 19 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर  13 जण उपचारानंतर बरे झाले. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 909 कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण आढळून आले असून 2 हजार 666 रुग्ण उपचारानंतर बरे झाले.

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून काल  ६३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर 84  रुग्ण या  आजारातून बरे झाले. जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 369  जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. त्यापैकी 34 जणांचा मृत्यू झाला, तर 3 हजार 424  रुग्ण आजारातून बरे झाले. जिल्ह्याचं  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 पूर्णांक  37 शतांश  टक्के इतकं  असून, मृत्यू दर शून्य पूर्णांक 78 शतांश  टक्के आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्री मिळालेल्या अहवालानुसार करोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण 90 पूर्णांक  29 शतांश  टक्के इतकं  झालं आहे.  काल 87 रुग्ण उपचारानंतर बरे झाले. त्यामुळे जिल्ह्यात  बरे झालेल्यांची संख्या 7 हजार 384  झाली आहे. दरम्यान काल जिल्ह्यात नवे 12 रुग्ण आढळले. त्यामुळे  कोरोना बाधितांची एकूण संख्या 8 हजार 178 झाली. सिंधुदुर्गात आज दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार 57   रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात  या आजारातून बरे झालेल्यांची  एकूण संख्या 3 हजार 803 झाली आहे,  तर  कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 4 हजार 520 झाली आहे.  आतापर्यंत 117 रुग्ण उपचारादरम्यान दगावले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

भंडारा जिल्ह्यात काल कोरोनाचे 149 रुग्ण बरे होऊन घरी गेले.  त्यामुळे  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5 हजार 852 झाली आहे. काल  104 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण  संख्या 7 हजार 296 वर पोहोचली.  हिंगोली जिल्ह्यात काल कोरोनाचे  13 नवे रुग्ण आढळून आले तर  15  रुग्ण बरे झाल्यानं  त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 922 रुग्ण उपचारानंतर  झाले.  वाशिम जिल्ह्यात आज सकाळपर्यंत  92 कोरोना  बाधित नवे रुग्ण आढळले तर  21 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.

जिल्ह्याची कोरोनाबाधितांची एकूण संख्या  5 हजार 240 वर पोहोचली असून 109 रुग्ण उपचारादरम्यान दगावले. नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचं  प्रमाण वाढलं आहे. काल दिवसभरात 1 हजार 80 रूग्ण बरे झाल्यानं  त्यांना रुग्णालयातून  घरी सोडलं.  काल दिवसभरात कोरोनाचे 482 नवे रुग्ण  आढळले, तर 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यात गेला महिनाभर  कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा  ताण कमी झाला आहे. जिल्ह्यात काल  दिवसभरात 128 कोरोना बाधित आढळून आले आहे. तर आजच 238 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. जळगाव जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 51 हजार 697 झाली आहे. तर आतापर्यंत  बरे झालेले  रुग्ण 48 हजार 355 आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी दर देखील  93 पूर्णांक 54 शतांश टक्क्यावर  वर गेला आहे.

सातारा जिल्ह्यात काल 264 नागरिकांचा कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव्ह आढळून आल्यानं जिल्ह्याची कोरोनाबाधितांची एकूण  संख्या 43 हजार  233 वर पोहोचली. काल  925 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या 35 हजार 699 इतकी झाली.

नांदेड जिल्ह्यात काल कोरोनाचे  105 नवे रुग्ण आढळून आले असून जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 17 हजार 897 झाली आहे. काल  जिल्ह्यात 209 रूग्ण बरे झाले. त्यामुळे  बरे झालेल्यांची  एकुण संख्या 15 हजार 601 झाली.

परभणी शहरासह जिल्ह्यात काल  दिवसभरात 13  जण  कोरोनाबाधित आढळले असून बाधितांची एकूण संख्या  6 हजार 211 इतकी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत  5 हजार 614 रुग्ण या आजारातून बरे झाले.

जालना जिल्ह्यात काल  दिवसभरात कोरोनाचे  76 नवीन रुग्ण आढळून आले असून  जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 9 हजार 698 झाली आहे.  काल 36 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  7 हजार 530 झाली आहे. काल  दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यानं  या आजारानं मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 253 झाली आहे.