मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात 25 ऑक्टोबरपासून जिम आणि फिटनेस केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जिम आणि फिटनेस केंद्रांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. जिम सुरू करताना आदर्श कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी जावी, अशी सूचना ठाकरे यांनी यावेळी केली.

फिटनेस केंद्रांना परवानगी दिली असली तरी स्टीम बाथ, सौना, शॉवर, सामूहिक झुम्बा आणि योग यांना असलेली मनाई कायम आहे. जिम आणि फिटनेस केंद्र सुरू झाल्यावर आरोग्याचे प्रश्न उद्भवू नयेत यासाठी काळजी घेण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

आदर्श कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिम आणि फिटनेस केंद्रांच्या मालकांवर असून यात हलगर्जीपणा आढळल्यास त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.