मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या व्यक्तींकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेनं, १ ऑक्टोबर २०२० ते २१ ऑक्टोबर २०२० या कालावधीत, १ कोटी ६४ लाख ९६ हजार ९०० रुपयांचा दंड वसुल केला, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. याअंतर्गत एकूण ८२ हजार ४९७ व्यक्तींवर मास्कचा वापर न केल्याबद्दल कारवाई केली अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली.

याशिवाय ९ एप्रिल ते २१ ऑक्टोबर या कालावधी दरम्यान, मास्कचा वापर न करणाऱ्या एकूण १ लाख ७५२ व्यक्तींकडून, पालिकने २ कोटी ३० लाख २९ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल केल्याचंही पालिकेनं कळवलं आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून मास्क लावणं बंधनकारक आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पालिकेनं २०० रुपयांच्या दंडात्मक कारवाईची तरतुद केली आहे.