मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांच्या सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.

महिलांच्या प्रश्नासंदर्भातलं कामकाज तसंच कोविड-१९ चे जागतिक तसंच देशांतर्गत परिणाम आणि उपाययोजना यासंदर्भात मिनिस्टर कौन्सेलर ब्रिटीश हायकमिशन श्रीमती कॅथी बज यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान डॉ.नीलम गोऱ्हे यांनी हे मत प्रदर्शित केलं.

श्रीमती कॅथी बज यांनी डॉ.गोऱ्हे यांचा काम करण्याचा आवाका आणि महिलांच्या प्रश्नांसंदर्भात केलेलं काम यांचं कौतुक केलं.इंग्लंडमध्ये आयुर्वेदिक औषधांचा प्रचार करण्याच्या हेतूनं  इंग्लंड शासनानं विविध उपक्रम घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.