नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या साथीशी लढा देण्यासाठी लोकांनी एकत्र यावे, या उद्देशानं सरकारनं सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून आरोग्य सेतू अॅप सुरू केल्याचा खुलासा इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं केला आहे.
आरोग्य सेतू अॅपबाबत माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय माहिती आयोगानं सरकारकडं खुलाशाची मागणी केली होती, त्याला उत्तर देताना इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.
या अॅपच्या निर्मितीत सहभागी असणाऱ्याची नावं हे अॅप सर्वांसाठी खुलं करतानाचा जाहीर करण्यात आली होती, अत्यंत पारदर्शक पद्धतीनं याचं काम झालं असून, आरोग्य सेतू पोर्टलवर सर्व माहिती देण्यात आल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.