नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर आणि लडाख या नव्यानं स्थापन केलेल्या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या भारताचा नकाशा केंद्र सरकारनं प्रकाशित केला आहे. नविन आराखड्यानुसार या नविन नकाशात २८ राज्य आणि ९ केंद्रशासित प्रदेश समाविष्ट आहेत.

गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, लडाख केंद्रशासित प्रदेशात करगिल आणि लेह या दोन राज्यांचा समावेश असून नविन जम्मू-काश्मिर या केंद्रशासित प्रदेशात याआधीच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातल्या प्रदेश समाविष्ट आहे.

दरम्यान लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.