नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भुवनेश्वर इथं झालेल्या ऑलिंपिक पात्रता फेरीत ८ वेळा विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघानं रशियाला ४-२ ने हरवत पुढच्या वर्षी टोकियो इथं होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

त्या आधी भारतीय महिला संघानं अमेरिकेला ६-५ ने नमवत ऑलिंपिक मधलं आपलं स्थान पक्क केलं.