नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड 19 चे 74 लाख 32 हजार 829 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता देशात रुग्ण बरे होण्याचा दर 91 पूर्णांक 34 शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे, तर मृत्यूदर एक पूर्णांक 49 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. जगातील हा सर्वात कमी मृत्यूदर आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

देशात काल कोविड 19 चे 551 रुग्ण मृत्युमुखी पडले त्यामुळे आतापर्यंत देशात या आजाराने मरण पावलेल्यांची एकूण संख्या एक  लाख 21 हजार 641 झाली आहे. गेल्या24 तासात देशात

कोविड 19 चे 59 हजार रुग्ण बरे झाले असून, सध्या 5 लाख 82 हजार रुग्ण उपचार घेत आहेत.

गेल्या 24 तासात 48 हजार 268 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंतची एकूण बंधितांची संख्या 81 लाख 37 हजार झाली आहे. दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अहवालानुसार गेल्या 24 तासात 11 लाख 64 हजार कोरोना संसर्ग चाचण्या करण्यात आल्या. लवकरच 10 कोटी 77 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण होईल, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.