पुणे : शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲङ आशिष शेलार हे पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

रविवार, दि. 11 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 3.30 वा. अतिवृष्टीने बाधित शाळा इमारतीबाबत शिक्षणाधिकारी (प्राथ) व (माध्य) यांच्या समवेत बैठकीस उपस्थिती (स्थळ- माध्य व उच्च माध्य शिक्षण मंडळ, राज्य मंडळ, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे) सायं. 6.15 ते 7.15 वा. पुणे भाजपा सदस्यता अभियान (स्थळ- महात्मा फुले वाडा, महात्मा फुले पेठ, पुणे) रात्रौ 7.30 वा. आनंदी खाडीलकर यांची भेट. रात्रौ 8.30 वा. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांची भेट (स्थळ – जयवंत बंगला, कात्रज डेअरी मागे, सावंत विहार फेज -3, पुणे) रात्रौ शासकीय विश्रामगृह, पुणे येथे मुक्काम.

सोमवार,दि. 12 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9.30 वा. बालभारती-  भेट व बैठक (स्थळ- सेनापती बापट रोड, शिवाजीनगर, पुणे) सकाळी 10.30 वा. व्हर्च्युअल क्लासरुम उदघाटन (स्थळ -विद्या परिषद, कुमठेकर रस्ता, पुणे) सकाळी 11.30 वा. दहावी सक्सेस मंत्रा – बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन    (स्थळ – गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट, पुणे) दुपारी 1 वाजता प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी शाळेचा रौप्य महोत्सव उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- मॉर्डन हायस्कुल, शिवाजीनगर, पुणे) दुपारी 3.30 वा. बालेवाडी परिसरातील विविध क्रीडांगणांना भेटी. सायं. 4.15 वा. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्राविण्यप्राप्त  खेळाडुंना रोख पारितोषिके प्रदान करण्याचा समारंभ (स्थळ – बालेवाडी, पुणे) सायं. 5.15 वा. क्रीडा विभागाच्या प्रलंबित कामाबाबत विविध अधिका-यांशी चर्चा (स्थळ-  बालेवाडी, पुणे) त्यानंतर सोईने मुंबईकडे प्रयाण.