नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान गुसेप काँते यांच्यात आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून द्विपक्षीय परिषद होणार आहे. दोन देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं हा या परिषदेचा उद्देश आहे.

याशिवाय, विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर परस्परांची मते यावेळी जाणून घेतली जाणार आहेत. दोन देशांच्या सरकारांदरम्यान आणि खासगी क्षेत्राशी संबधित काही करारांना आणि सामंजस्य करारांना अंतिमस्वरूप देण्याचं काम सुरू असून आज त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं आहे.