नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासांत ४९ हजारांहून अधिक रुग्ण बरेझाले असून या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ७८ लाख ६८ हजार झाली आहे. कोविडपासून बचावकरण्यासाठी उचललेली योग्य पावलं आणि नियमित तपासणीमुळे कोविड रुग्ण बरे होण्याचादर ९२ पुर्णांक ४९ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात पन्नास हजारपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली तर ४५ हजार ६७५ लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्रीयआरोग्य विभागानं ही माहिती दिली. देशात १५ऑक्टोबरपासून दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी होत आहे. सध्या देशात ५ लाख १२ हजार सक्रीय रुग्ण असून ही संख्या एकूणरुग्ण संख्येच्या ६ पुर्णांक३ दशांश टक्के आहे.भारतात कोविड रुग्णांचा मृत्यूदरही केवळ १ पुर्णांक ४८ शतांश टक्के आहे.

दरम्यान  राज्यात काल दिवसभरात ६हजार ७४८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या१५ लाख ६९ हजार ९० झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ पूर्णांक ५४शतांश टक्के झालं आहे. काल दिवसभरात तीन हजार ९५९ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली,त्यामुळे राज्यात या कोरोना संसर्गाच्या रुग्णांची एकूण संख्या १७लाख १४ हजार २७३ झाली आहे. काल दिवसभरात या संसर्गाने १५० रुग्णांचा मृत्यू झाला,त्यामुळे राज्यात, या संसर्गान मृत्यूझालेल्यांची एकूण संख्या ४५ हजार ११५ झाली आहे. सध्या राज्यात ९९ हजार १५१ रुग्णांवर विविध रुग्णालयांमधून उपचार सुरु आहेत.