सर्व डेंटल उपकरणे एकाच छताखाली मिळणार
मुंबई : बीटूबी वैद्यकीय उपकरणे आणि पुरवठ्यासाठी भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन पोर्टल असलेल्या मेडिकाबाजारने, एक्सक्लुझिव्ह मायक्रोसाइट लाँच केली. डेंटिस्ट आणि डेंटल क्लिनिक करिता एकाच छताखाली सर्व डेंटल सोल्युशन्स मिळण्याचा उद्देश यामागे आहे. या उपक्रमाअंतर्गत, कंपनीने अनेक ऑफर्स एकत्र दिल्या असून यामुळे मायक्रोसाइटला मूल्य प्राप्त झाले आहे. यात प्रॉडक्ट रेंज, जागतिक पातळीवरील लॅब, सहज वित्तीय पर्याय किंवा विशेष ऑफर, डिस्काउंट इत्यादींचा समावेश आहे.
या डेंटल कॅटलॉगमध्ये २०,००० पेक्षा जास्त उत्पादने असून यामुळे हे भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन डेंटल कॅटलॉग बनले आहे. या श्रेणीतील सर्व अग्रगण्य ब्रँड्सचा यात समावेश आहे. मेडिकाबाजार ने जपानच्या झूलॅबो सोबत भागीदारी केली असून जागतिक पातळीवरील डेंटल क्षेत्रात हे महत्त्वाच्या नावांपैकी एक आहे. डेंटल मायक्रोसाइट लाँच ऑफर म्हणून २,४९९ रुपयांपेक्षा जास्त डेंटल उत्पादन खरेदीवर मेडिकाबाजार २५% ऑफर देत आहे. अधिकृत डेंटल सप्लाइज, उत्पादन शोधण्यापासून, विविध ब्रँडमधील किंमतीतील तुलना इत्यादी अनेक सुविधा या साइटवर उपलब्ध आहेत. डेंटल क्लिनिक स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पादनांची संपूर्ण श्रेणी येथे उपलब्ध आहे.
मेडिकाबाजारचे संस्थापक आणि सीईओ श्री विवेक तिवारी म्हणाले, “ डेंटिस्ट किंवा डेंटल क्लिनिकच्या विशिष्ट गरजांमुळे ऑनलाइन खरेदीकरिता डेंटल ही लोकप्रिय श्रेणी उदयास येत आहे. मेडिकाबाजारमध्ये संपूर्ण आरोग्य उत्पादने उपलब्ध आहेत. येथे ५ लाख एसकेयू असून डेंटल उत्पादनांसाठी २०,००० एसकेयूसाठी कॅटलॉग तयार करण्यात आले आहे. आमच्या सर्व वितरणांप्रमाणेच, डेंटल उत्पादनेदेखील देशभरातील २६ सेंट्रल डिस्ट्रिब्युशन आणि फुलफिलमेंट सेंटर्सद्वारे वितरित केली जातील.”