नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरीयाच्या अलेप्पो प्रांतात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या अझाझ या शहरात काल झालेल्या एका स्फोटात ७ जण ठार झाले, तर २०हून अधिक जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी या परिसरात हॉटेलं असलेल्या गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणला असं, आंतराष्ट्रीय मानवी आयोगाच्या सिरीयातल्या निरीक्षकांनी सांगितलं. हा हल्ला कोणी घडवून आणला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.