नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि लॅट्वियाची जेलेना ओस्तापेंको या जोडीचा दुस-या फेरीतला सामना आज अमरिकेचा बेथानी मॅटेक सँड्स आणि ब्रिटेनची जॅमी मर्रे या जोड़ीशी होणार आहे.

काल राफेल नादाल, स्तान वावरिंका, डोमिनिक थि‍एम आणि सिमोना हालेप यांनी आपापल्या गटात एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत अग्रमानांकित राफेल नादालनं निक किर्जियोसला चार सेट्सच्या उत्कंठावर्धक सामन्यात हरवलं. उपांत्यपूर्व फेरीत राफेलचा मुकाबला ऑस्ट्रियाच्या पाचव्या मानांकित डोमिनिक थिएमशी होईल.